रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना l असा भूत कालीन सिध्द्धांत जाणा ll
स्वराज्येछुने पाहिजे युद्ध केले l रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ll
स्वातंत्र्ययज्ञ
स्मरण
पुष्प
१.
स्वा.
सावरकरांनी आपल्या कुलस्वामिनीसमोर अत्यंत लहान वयात शपथ घेतली की, “देशाचे
स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु उभारून मी मारता मारता मरेतो
झुंजेन.”
१९०४
साली स्वा. सावरकरांनी नाशिक येथे ‘मित्रमेळा’ या संस्थेचे ‘अभिनव भारत’
असे नवे नामकरण केले. सहस्रावधी तरुण राष्ट्र भक्तीने प्रेरित होऊन सदस्य बनले. श्रीशिवछत्रपतींच्या
छायाचित्रासमोर त्यांना शपथ देण्यात येई. ती शपथ पुढीलप्रमाणे:
“ श्री
शिवाजी महाराजांच्या पायावर हात ठेवून, माझ्या पवित्र धर्माला स्मरून, माझ्या
प्रिय देशाला स्मरून, माझ्या पूर्वजांना व वंशजांना स्मरून मी अशी शपथ घेतो की
माझ्या देशाची खरी उन्नती पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज कधीही व्हावयाची नाही, अशी
माझी खात्री आहे. तेव्हा माझ्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कामी मी
आजन्म यथाशक्ति शक्य तितका प्रयत्न करून तन-मन-धन अर्पण करीन. यात कसूर करणार
नाही. अभिनव भारतीय सार्वत्रिक नियम मी आजन्म पालीन, व यातील गुप्त गोष्टी मी
बाहेर कधीही फोडणार नाही. ह्या शपथेच्या विरुद्ध वागल्यास मला मातृगामानाचे पातक
लागो व मला रौरव नरक मिळो. शिवाजी महाराज की जय ! स्वातंत्र्याचा विजय विजय असो !
वंदे मातरम् ! “
No comments:
Post a Comment